सरकारचा मोठा निर्णय : कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि  उपचार  मोफत करणार

मुंबई नगरी टीम

लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण  व  औषधी द्रव्ये विभागाच्या  अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय  तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार  मोफत  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण  व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित  देशमुख यांनी यांनी आज येथे दिली.

जागतिक आरोग्य संघटने कडून कोरोनाचा प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे मोफत करण्यात आले आहेत.कोरोनाग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात. असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-१९ ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल  असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.

Previous articleपरळीत ८ दिवसात १ लाख १४ हजार नागरिकांचे थर्मल टेस्टिंग
Next articleराज्यात आज कोरोनाचे ३९४ नवीन रुग्ण ; रुग्णांची संख्या ६८१७ वर