राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे ३० हजार पात्र मानधन धारकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी सर्व मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

देशमुख यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२१ अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यात येत असून, यासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झालेली आहे.राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबवण्यात येते. अलीकडेच या मानधनधारकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय (अ श्रेणी रुपये ३१५०, ब श्रेणी रुपये २७००, क श्रेणी रुपये २२५० ) मानधन दरमहा अदा करण्यात येते.

Previous articleभाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले : नाना पटोले
Next articleधनंजय मुंडेंची वचनपूर्ती तर अजून एक घेतला महत्वाचा निर्णय