येत्या ५ ऑगस्ट रोजी राज्यातील नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील औरंगाबाद, लातूर,परभणी,चंद्रपूर,भिवंडी- निजामपूर,मालेगाव,पनवेल,मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या ९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ५ ऑगस्ट रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला,अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी ५ ऑगस्ट रोजी सोडत काढली जाईल. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर ६ ते १२ ऑगस्ट या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे.

Previous articleमोठा निर्णय : राज्यात प्लास्टिकच्या डीश,कप,ताटे,ग्लास, काटा, वाडगा,कंटेनरवर बंदी
Next articleकाही तरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले