मंत्रिमंडळाचा निर्णय : राज्यातील महानगरपालिकांतील स्वीकृत सदस्यांची संख्या वाढणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित असतानाच महानगरपालिकांतील स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.महानगरपालिकांमध्ये संध्या स्वीकृत सदस्यांची संख्या ५ असून आता ती वाढवून १० करण्यात आली आहे. महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने स्वीकृत सदस्यांची संख्या सुधारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

सध्या महानगरपालिकांतील स्वीकृत पालिका सदस्यांची संख्या पाच आहे.राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी,कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड स्वीकृत सदस्य म्हणून केली जाते.अशाप्रकारे नियुक्त केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने आता महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महानगरपालिकेत ५ ऐवजी १० स्वीकृत सदस्य घेतले जातील.मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार दहा स्वीकृत सदस्य व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार दहा टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाहीत किंवा दहा पालिका सदस्य,यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला.

Previous articleसरकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सरकारचा मोठा निर्णय;बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला
Next articleराहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राज्यात काँग्रेसचे ” हाथ से हाथ जोडो अभियान”