मद्यप्रेमींनो..आता इ-टोकन घ्या आणि दुकानातून दारू खरेदी करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात दुस-यांदा टाळेबंदी लागू केल्यानंतर काही अटी आणि शर्थीवर राज्यातीस मद्यांची दुकाने सुरू करण्यात आली होती.मात्र दुकानासमोर होणारी गर्दी पाहून काही शहरातील मद्यांची दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी पासुन सुटका व्हावी आणि कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार होवू नये यासाठी इ – टोकन सुविधा उपलब्ध केली आहे.

राज्यात काही अटी आणि शर्थीवर मद्यांची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र मुंबईसह अनेक शहरात दारूच्या दुकानासमोर होणारी गर्दी पाहून मुंबईतील दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यातील अनेक शहरामध्ये दारूची दुकाने सुरू आहेत.अशा दुकानातील गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी पासुन सुटका व्हावी म्हणून इ – टोकन सुविधा उपलब्ध केली आहे.सदर सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर चालू केलेली आहे.ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचे आहे अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून इ – टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे.सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणा-या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. सदर पैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास इ – टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोइच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून  मद्य खरेदी करु शकतात.

Previous articleउद्धव ठाकरे यांच्याकडे १४३ कोटींची संपत्ती मात्र एकही वाहन नाही
Next articleविधान परिषद निवडणूक  बिनविरोध;या उमेदवारांनी घेतली माघार