फडणवीस पवार यांच्या शपथविधीचा प्लॅन कसा ठरला !

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपशी हातमिळवणी करीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारे अजित पवारांचा संपर्क कोणालाच होत नव्हता.राज्यातील सत्तासंघर्षाची कोणालाच कल्पना नव्हती.हे सत्तानाट्य कसे घडले याची सहस्यमय कहाणी ज्येष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘चेकमेट : हाऊ दी बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात कथन केली आहे.

नेहरू सेंटर येथील झालेल्या शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.राज्यपालांकडे सत्तास्थापानेचा दावा करण्यापूर्वीच शपथविधी उरकण्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ठरल होते.त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी पहाटे फडणवीस आणि अजित पवार यांचा राजभवनात शपथविधी पार पडला.या शपथविधी सोहळ्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता.अजित पवार यांनी ३८ आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर रात्री १२.३० वाजता पोहचण्याचे फर्मान काढले.याबाबत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनाही माहिती देण्यात आली होती.मात्र धनंजय मुंडे  यांना हे मान्य नव्हते.ठरल्या प्रमाणे मुंडे यांच्या बंगळ्यावर आमदार जमण्यास सुरवात झाली होती. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार या बाबत समन्वय करीत होते. मुंबईच्या विमानतळावर दिल्ली आणि हरियाणाला आमदारांना घेवून जाण्यासाठी  खाजगी विमाने तयार ठेवण्यात आली होती.शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी बैठक बोलावली असल्याचा समज या आमदारांचा होता.मात्र काही आमदारांना हा निर्णय अजित पवार यांचा असल्याचा समजताच त्यांनी या बंडातून माघार घेतली होती असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

हे पुस्तक या लिंकवर उपलब्ध आहे-Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra https://www.amazon.in/dp/B088P3596L/ref=cm_sw_r_wa_api_i_qkkWEb7VRA01E

मुख्य सचिव अजोय मेहता यांना दिल्लीहून तात्काळ मुंबईत बोलविण्यात आले. मुंबईत आल्यावर त्यांनी थेट राजभवन गाठलं. त्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट लवकरात लवकर उठवली जावी यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या.पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून बाकीचे गोष्टी उरकण्यात आल्या.पंतप्रधान कार्यालयाने विशेषाधिकाराचा उपयोग करून राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय घेवूम हा निर्णय राष्ट्रपती भवनाला कळवला.यानंतर राष्ट्रपती भवनावरून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात पहाटे ५ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी याबाबत गॅझेट निटिफिकेशन काढण्यात आले.२२ तारखेला उशिरा रात्री फडणवीस यांनी गिरीश महाजन आणि भाजाप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वर्षावर पोहचण्याचा निरोप धाडला. त्यानंतर सकाळी  फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील आणि गिरीष महाजन यांना घेवून राजभवन गाठले.राजभवनांवर अजित पवार,सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना बघून पाटील आणि महाजन यांना  धक्काच बसला. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.५० वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला.या शपथविधीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता.

Previous articleचंद्रकांतदादांवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकरांचा  हल्लाबोल
Next articleदेशाच्या तुलनेत मुंबईत तिपटीहून अधिक पॉझिटिव्हीटीचा दर