विरोधी पक्ष नेते अलिबाग व रायगड दौऱ्यावर

मुंबई नगरी टीम

मुंबई : निर्सग चक्रिवादळाचा मोठा फटका कोकणाला बसला असून, वादळामुळे प्रभावित होऊन उध्वस्त झालेल्या कोकणातील  नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विधानभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आज गुरुवारी ११ जून  रोजी अलिबाग व रायगडचा दौरा करणार आहेत.

या दौ-यात माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड उपस्थित असतील. या दौऱ्याची सुरुवात सकाळी ९.४५ वाजता रेवदंडा येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन होणार आहे.सकाळी १०.३० च्या सुमारास अलिबाग मधील चौल या गावाची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १ वाजता काशीद त्याचबरोबर दुपारी १.३० च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजापुरी या गावाची पाहणी करण्यात येणार आहे.दुपारी ३.३० च्या सुमारास दिवे आगार येथे पाहणी करण्यात येणार असून सायंकाळी ४.४५ च्या सुमारास श्रीवर्धन मधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात येणार आहे.

Previous articleकोरोनामुळे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले,आता या तारीखेला होणार !
Next articleदेवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका