मुंबई नगरी टीम
सातारा : राज्यात येत्या ३१ जूलैपर्यंत काही सवलती देवून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनमध्ये काही निर्बंध शिथील केले असले तरी राज्यातील जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही. असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केल्याने एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात पास असल्यासच प्रवास करता येणार आहे.
राज्य सरकारने येत्या ३१ जूलैपर्यंत काही काही निर्बंध शिथील करत लॉकडाउन जाहीर केला आहे.सध्या राज्यातीस एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यातील प्रवासासाठी पास आवश्यक असून,पासाशिवाय असा प्रवास करता येत नाही हाच नियम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही.असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. लॉकडाउनंतर शिथिलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय मजूर परत राज्यात येत आहेत. कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरण वाढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.करोनाच्या पार्श्वभूमीवर ५५ वर्षावरील १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ५० ते ५५ वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना साधेकाम देण्यात आले असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.