सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून उसळलेल्या वादावर राज ठाकरेंनी मांडली भूमिका

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही कशी चालते यावरून समाज माध्यमातून जोरदार चर्चा सुरू असून,आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरी झडत असतानाच माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला गेला.ह्या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समाज माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाही विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज अठविला जात आहे.या प्रकरणी अनेक अभिनेत्यावर आरोप केले जात आहेत.त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे आपली भूमिका मांडली आहे.सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला गेला.ह्या वादाच्या अनुषंगाने ‘ह्यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा’ अशा आशयाच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी हे इथे स्पष्ट करू इच्छितो, ह्या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Previous article१७ हजार पदांच्या भरतीसाठी ६ जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे ;अर्ज असा भरा
Next article….. लढाई अजून संपलेली नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे