राज्याचे उत्पन्न वाढीचे प्रयत्न अधिक वेगवान व्हावेत सुधीर मुनगंटीवार

राज्याचे उत्पन्न वाढीचे प्रयत्न अधिक वेगवान व्हावेत

सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि.10 राज्याचे करेतर उत्पन्न वाढवण्याच्यादृष्टीने संबंधित विभागांनी त्यांचे प्रयत्न अधिक वेगवान करावेत अशा सूचना देतांना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाढीव उत्पन्नाचा लाभ विकासापासून वंचित राहिलेल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी केला जाईल असे सांगितले.

काल सह्याद्री अतिथीगृहात उत्पन्न वाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह गृह, नगरविकास, परिवहन, महसूल, वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क अशा विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात असल्याचे सांगतांना श्री. मुनगंटीवार म्हणाले की, पायाभूत सुविधा, कृषी, सिंचन व्यवस्था, पर्यटन विकास अशा विविध विकासकामांसाठी तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वाढीव उत्पन्नाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन करेतर महसूल कसा वाढवता येईल या अनुषंगाने आवश्यकता असल्यास सध्याच्या नियमात बदल करणे, नवीन कायदे करणे यासारख्या गोष्टींची पुर्तता केली जावी. राज्यात एकूण शासकीय जमीनी किती आहेत, त्याचा अभ्यास केला जावा तसेच शासकीय जमीनीवर अतिक्रमण होणर नाही यादृष्टीने कडक धोरण आखावे. राज्यात परराज्यातील कंपन्या, बँका, वित्तीय संस्थांमध्ये होणारे करार हे सध्या राज्याबाहेर नोंदवले जातात. कारण राज्यात यासंबंधीचे दर अधिक आहेत. हे करार राज्यात होण्याकरिता कोणत्या उपाययोजना कराव्यात याचा सखोल अभ्यास करून तसा प्रस्ताव सादर केला जावा, असेही ते म्हणाले.

लोकहिताच्या आणि राज्य विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करतांना अर्थखाते सक्षम होण्यासाठी करेतर महसूल कशाप्रकारे वाढवता येईल यादृष्टीने सर्व विभागांनी अभ्यास करून त्यासाठीचे प्रयत्न नेटाने करावेत असे वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगतले.
….

Previous articleप्रदुषण मुक्त दिवाळी साजरीकरण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचेआवाहन
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here