महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी येण्याची शक्यता

मुंबई  दि.10 राजधानी दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

दिल्ली एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही फटाके विक्रीला बंदी येते का, हे पाहणं महत्वाचं आहे. मंत्रालयात विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली, त्यावेळी रामदास कदम बोलत होते.

Previous article
Next articleवर्षभरात 80 हजार 729 कृषी पंपांना वीज जोडणी देणार