मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या संकटात राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची शिवनेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती होताच राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.त्यांना आजपासून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
रत्नागिरीचे शिवसेना आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची कालच शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्ती नंतर राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.कोरोनाच्या संकटात राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते आपल्या निर्णयवर ठाम होते.त्यांनी गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यानी घेतले.त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे देखील सर्व स्तरातून स्वागत झाले आहे.त्यांच्या अनेक निर्णयामुळे त्यांच्या ट्विटरवर लाखो चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे.
शिवसेनेचे आमदार उदय सामंत हे महाविकास आघाडीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम पहात आहेत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्व पूर्ण निर्णय त्यानी घेत त्यांनी प्रसिद्ध माध्यमामध्ये घेतलेल्या भूमिकेचे देखील सर्व स्तरातून स्वागत झाले आहे. सामंत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ह्या दोघांचेही निकटवर्तीय मानले जातात आणि म्हणूनच त्यांनी काल शिवसेना पक्षांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेत असून देखील त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.पक्षाची बेधडक भूमिका मांडणारे सामंत यांची शिवसेनच्या प्रवक्तेपदी नियुक्ती होताच आज त्यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे त्यांना आजपासून वाय प्लस दर्जाचे संरक्षण देण्यात आले आहे.