मुंबई नगरी टीम
मुंबई : माझा भाजपवर रोष नाही, कोणत्याही केंद्रीय नेत्यावर नाराजी नाही.केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.जयंत पाटलांनी आज पत्रकार परिषद घेत खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली एकनाथ खडसे यांनी आज आपल्या भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.यावेळी एकनाथ खडसे यांनी आपली मनातील खदखद पुन्हा बोलून दाखवली.
आज मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे.गेली ४० वर्ष भाजपचे काम करत होतो.या ४० वर्षात अनेक प्रसंग आले.भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती.त्यावेळपासून आजतागायत भाजप पक्षाचे काम प्राणिकपणे करत आलो.तर भाजपने देखील या कार्यकाळात मला अनेक पदे दिली.ते नाकारू शकत नाही असे म्हणत एकनाथ खडसेंनी आपला भाजपबद्दल कोणताही रोष नाही, असे स्पष्ट केले. तसेच आपण कोणत्याही केंद्रीय नेत्यावर किंवा पक्षावर टीका केली नाही, असेही खडसेंनी सांगितले.
माझ्या अनेक चौकश्या झाल्या,भूखंड हडप करण्याचे आरोप झाले,माझ्यावर खोट्या विनयभंगाचा खटला देखील दाखल करण्यात आला.दमानिया यांनी त्यांचा विनयभंग केल्याचा खोटो खटला दाखल केला.मी जेव्हा खटला दाखल करण्यासंबंधी देवेंद्र फडणववीस यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ती महिला फार गोंधळ घालत होती. टीव्हीवर दाखवले जात होते. म्हणून नाईलाजास्तव गुन्हा नोंद करायला सांगितले.या प्रकारामुळे मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झाले.या खटल्यातून मी नुकतंच पंधरा दिवसापूर्वी बाहेर आलो. छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या.तरीही इतके दिवस मी सहन करत आलो. माझ्या चौकशीच्या निमित्ताने माझा राजीनामा घेतला गेला,अशी खंतही खडसेंनी व्यक्त केला.
तरीही त्यानंतर मी ४ वर्ष काढली.माझ्या कथित पीएवर त्यांनी नऊ महिने पाळत ठेवली.आयुष्यात मला काय मिळाले नाही मिळाले याचे दु:ख नाही.पण मनस्ताप झाला याचे जास्त दु:ख आहे.मला जी काही पदे मिळाली ती माझ्या ताकदीवर,म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला.माझा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे.महाराष्ट्रातील जनतेने मला मोठ्या प्रतिसाद दिला आहे आणि आजही देत आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले.