एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई नगरी टीम

मुबई : नाराज एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या. पंरतु या सगळ्या अफवा आहेत.भाजपला नुकसान होईल,असे कोणतेही कृत्य एकनाथ खडसे करणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता.पंरतु आज एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाराज खडसेंची समजूत काढणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा आशावाद मावळला आहे.खडसे यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलताना ते म्हणाले,नाथाभाऊ आणि आमच्यात संवाद सुरू होता.आज सकाळी जयंत पाटलांचे ट्वीट रिट्विट केले आणि मग डिलीट केले.तोवर आम्हाला आशा होती की,ते सोडून जाणार नाही.त्या क्षणापर्यंत दोर तुटेलेला नाही, असे आम्हाला वाटले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खडसेंचे जे काही आरोप असतील त्याबद्दल त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे.फडणवीसांनी ही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.परंतु यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.एखाद्या घटनेविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. खडसे यांना आमच्या पक्षात एक स्थान होते. त्यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले.मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत,अशी प्रतिक्रियाही पाटील यांनी व्यक्त केली.
खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे.खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत होते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते.आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.ते ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा.खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही,असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याचा मोठा दणका भाजपला बसला आहे.तर खडसेंच्या नाराजीचे मुख्य कारण हे देवेंद्र फडणवीस आहेत.फडणवीस यांच्यामुळेच आपण पक्ष सोडला,अशी प्रतिक्रिया खडसेंनी राजीनाम्यानंतर दिली.खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. मला एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही.अधिकृतरीत्या राजीनामा दिल्याचे कळल्यावरच मी यावर बोलेन, असे फडणवीस म्हणाले.

Previous articleफक्त देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडतोय : एकनाथ खडसे
Next articleएकनाथ खडसेंच्या पाठोपाठ लेकीचाही राष्ट्रवादीत प्रवेश ? रोहिणी खडसेंनी दिले संकेत