राज्यात मोठ्या घडामोडी ; महाविकास आघाडीच्या आमदारांची तातडीची बैठक

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना ( उबाठा ),काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) समाजवादी पार्टी,शेकाप या महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्वाची बैठक आज ( बुधवारी ) एमसीए येथे होणार आहे.या बैठकीला शिवसेना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.शिवसेना ( उबाठा ),काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) समाजवादी पार्टी,शेकाप या पक्षाच्या आमदारांची आज सांयकाळी चर्चगेट येथील एमसीए येथे महत्वाची बैठक पार पडणार आहे.या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी,शेकापचे नेते जयंत पाटील,शिवसेना उबाठाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Previous articleसंग्राम थोपटे नव्हे तर विजय वडेट्टीवार होणार विरोधी पक्षनेते ; नाना पटोले गैरहजर
Next articleपटोलेंचे मोदींना प्रत्युत्तर ; कर्नाटकवरचे कर्ज ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारचेच