पदवीधर आणि शिक्षक निवडणूकीसाठी रामदास आठवलेंचा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात येत्या १ डिसेंबर रोजी होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली.तीन पदवीधर मतदारसंघ आणि एका शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढत असलेल्या भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर;पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख; नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघातील भाजपचे संदीप जोशी; अमरावती शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. नितीन धांडे; या सर्व भाजप उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

Previous article१४ हजार २३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय
Next articleमंत्री जयंत पाटलांच्या वक्तव्यावर ‘या’ नेत्याने व्यक्त केला संशय