अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधत आपल्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी यादी राज्यपालांना सादर करण्यात आली आहे.शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.सध्या राज्यपाल आणि राज्य सरकार मधील संबंध पाहता अशा नियुक्त्या करताना राज्यपाल नियमांचे काटेकोर पालन करणार हे गृहीत धरून कला क्षेत्रातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस शिवसेनेने केली आहे.उर्मिला यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेस पक्षाकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती.या निवडणूकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता.त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील स्थानिक पदाधिका-यांच्या गोंधळावर बोट ठेवत काँग्रेसला रामराम केला होता. गेली एक वर्ष त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या.आज शिवसेनेत प्रवेश करीत त्यांनी नव्याने राजकीय वाटचाल सुरु केली आहे.

Previous articleप्रत्येक निवडणूक ही परीक्षा,त्यात आम्ही निश्चित पास होऊ : देवेंद्र फडणवीस
Next articleपदवीधर निवडणूक निकालानंतर सत्ता बदलाच्या प्रक्रियेला सुरूवात : भाजप खासदाराचा दावा