पुन्हा एकदा हे सरकार तोंडावर आपटलं : दरेकरांचा हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई : आरे करशेड हलवू नये अशी आम्ही वारंवार मागणी करत होतो.तरी देखील कोणालाही नजुमानता या सरकारने कारशेड हलवण्याचा विचार केला.कोर्टाने या प्रकल्पाला स्थगिती दिलीअसुन पुन्हा एकदा हे सरकार तोंडावर आपटंल अशी टिका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

सरकारला आपला मी पणा महागात पडला.कारण प्रकल्प लांबणीवर गेल्यावर अडचणी वाढतील. आज मेट्रो प्रकल्पाला स्थगिती दिली गेली. आता फेब्रुवारी पर्यंत स्थगिती असेल तर वाढणार प्रकल्पाचा खर्च कोण भरणार? हा प्रकल्पाचा खर्च शेवटी जनतेचा खिशातून जातो, असा प्रश्न विचारात सरकारवर दरेकरांनी टिका केली.मुंबईकरांच्या हिताचे काय आहे या कडे सरकारचे लक्ष नाही. पण सरकारला भारतीय जनता पार्टी ने जो प्रकल्प सुरू केला आहे. तो प्रकल्प स्थलांतरित करावं, नाव बदलाव, उशीर झाला तरी चालेल अशी मानसिकता आहे. कोर्टाच्या चपराकी नंतर तरी सरकारने दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे,असे दरोकरांनी सरकारला टोला लागवला.

Previous articleभाजपा हा महाराष्ट्राच्या विकासाच्या झारीतील “कमळाचार्य”
Next articleसरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द ;गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरिता निर्णय