बापरे ! राज्यात आज २३ हजार १७९ नवीन कोरोनाचे रुग्ण ; ८४ रुग्णांचा मृत्यू

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज राज्यात एकूण २३,१७९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून,८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मुंबईत आज २ हजार ३७७ नव्या रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.

या वर्षातील राज्यातील कोरोना रूग्णांची सर्वाधिक रूग्ण संख्येची नोंद आज झाली आहे. राज्यात आज २३ हजार १७९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज ९,१३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरतल्याची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ टक्के एवढे झाले आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ टक्के एवढा आहे.सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज रोजी एकूण १,५२,७६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Previous articleसचिन वाझेंचा सरकारमधील बोलविता धनी कोण ? त्याचा शोध घेणे गरजेचं
Next articleसचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा कुणी घेतले ? गृहमंत्र्यांनी दिले उत्तर