संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई-रावतेंचा इशारा

 

मुंबई दि.17 एसटी कर्मचाऱ्यांचा संप चुकीचा आहे संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा एसटी व्यवस्थापकीय संचालकांनी दिला आहे. कामगारांचा संप बेकायदेशीर असून काँग्रेसचे छाजेड नावाचे नेते कामगारांची दिशाभूल करत आहेत.  एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकार सहानुभूतीने विचार करीत आहे. मात्र सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य करणे शक्य नाही. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा आयोग लागू करणे शक्य नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिला आहे. अशा परस्थित परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग कसा लागू करणार असा सवाल परिवहन मंत्री रावते यांनी उपस्थित केला.

सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये. प्रवासीच आपले अन्नदाता आहेत. त्यांचा विचार करावा. हा संप कामगारांच्या हिताचा नाही. याने कामगारांचेच नुकसान होणार आहे. प्रवाशांचा विचार करुन संप मागे घ्यावा , असे आवाहन रावते यांनी केले.

Previous articleविविध पक्षांचे १५ ते २० आमदार संपर्कात –  आठवले यांचा गौप्यस्फोट
Next articleमंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळी नंतर,  राणेंना मिळणार मंत्रिमंडळात स्थान- मुख्यमंत्र्यांचे संकेत