मुंबई १७ गेले अनेक दिवस चर्चा होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दिवाळी नंतर मुहूर्त मिळणार आहे. नुकतेच रालोआमध्ये सामील झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही मंत्रिमंडळात देणार असल्याचे स्पष्ट संकेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले .
शेतकरी कर्जमाफीसाठी एकूण 80 लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून उद्या बुधवार पासुन प्रत्यक्षात कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. उद्या दहा लाखांपेक्षा जास्त शेतक-यांना याचा लाभ मिळणार असल्याने ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँका कर्जमाफीचे पैसे लाटूच शकणार नाहीत असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला .
मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी दैण्यास उद्यापासून सुरूवात होवून, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील सुरुवात होईल. उद्या दहा लाखांपेक्षा जास्त शेतक-यांना लाभ मिळेल. पुढील प्रत्येक दिवशी किमान 2 ते 5 लाख खात्यात रक्कम जमा होतील . येत्या महिन्यात 80 टक्के प्रक्रिया पूर्ण होईल. ऑनलाईन प्रक्रियेमुळे बँका मागील कर्जमाफी प्रमाणे या कर्जमाफीचे पैसे लाटू शकणार नाहीत असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कोपर्डी बलात्कार खटल्याचा निकाल 1 जानेवारी पर्यंत लावावा अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा राषाट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी खा. सुळे यांना टोमना लगावत, राज्यात त्यांच्या भरवशावर फिरत नाही, तर जनतेच्या भरवशावर फिरतो. अशी वक्तव्य केल्यामुळे आरोपीला फायदा होतो. खटल्याचा निर्णय लावणे आमच्या हातात नाही, न्यायालयाच्या आहेत. खोट्या राजकीय फायद्यासाठी अशी वक्तव्य करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.राजकारणात काही गोष्टी बोलायच्या असतात, काही बोलायच्या नसतात. यापुढे आमची प्रत्येक हालचालींवर नजर असेल. पैसे देऊन नगरसेवक फोडले, या खा. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या समाज माध्यम मुख्य माध्यम झाले आहे. सरकारच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर एजन्सीला काम दिले तर काय बिघडले, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या खोट्या अकाउंटच्या लोकांनाच नोटिसा पाठवल्या आहेत. त्या कोर्टात मांडल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अहमदनगर येथे घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नगर मधिल पोलीस हवालदार हा एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचा भाऊ आहे. हा पोलीस दोन महिने समाज माध्यमांवर प्रचार करत होता. त्याचे पुरावे आहेत. पोलीस जर प्रचारात उतरुन सरकारच्या विरोधात लिहायला लागले, तर कायदा सुव्यवस्था उरणार नाही, त्यामुळे त्या पोलिसाला नोटीस पाठवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.