भाजपला धक्का : सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । जळगावातील मुक्ताईनगर नगरपंचायतीतील भाजपच्या सहा नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताईनगर नगरपंचायत मधील सहा नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

जळगाव नंतर भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने आणखी एक मोठा झटका दिला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत मधील सहा नगरसेवकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.जळगाव महानगरपालिकेनंतर मुक्ताईनगर नगरपंचायत मधील सहा नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.मुक्ताईनगर नगरपंचायतीचे भाजपचे गटनेते पियुष महाजन यांच्यासह,मुकेश वानखेडे,संतोष कोडी,शबाना अब्दुल अरिफ,नुसरत मेहबुब खान,बिलकीज बी अमान उल्लाखान या नगरसेवकांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेने काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल ३० नगरसेवक आपल्या गळाला लावले होते.त्यामुळे भाजपला मोठा झटका बसला होता.जळगाव नंतर शिवसेनेने मुक्ताईनगर मधील सहा नगरसेवकांना पक्षात घेवून भाजपला दुसरा दणका दिला आहे.त्यामुळे जळगाव पाठोपाठ आता मुक्ताईनगर नगरपंचायत मध्येही भाजपला मोठा दणका दिला आहे.

Previous articleमराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान भाजपाला शिकवू नका
Next articleलॅाकडाऊन सुरू राहिल्यास राज्यातील उद्योग शेजारच्या राज्यात जाण्याची भिती