मुंबई नगरी टीम
पुणे । पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत.त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती,अशी कबुली दिल्यानंतर अजितदादांना सत्ता स्थापन करता येते,पण टिकवता येत नाही असा टोला पाटील यांनी लगावला होता त्यांच्या या टीकेचा खरपूस समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.
अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती,अशी कबुली काल विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.त्याच्या या कबुलीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर निशाणा साधत, अजितदादांना सत्ता स्थापन करता येते,पण टिकवता येत नाही,असा टोला लगावला.पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना पलटवार केला आहे.विरोधकांना काही कामधंदा नाही.त्यामुळे ते ती गोष्ट उकरून काढत आहेत,अशा शब्दात टीका पवार यांनी पाटलांना लक्ष केले.पहाटेच्या शपथविधीला 14 महिने झाले आहेत. तरीही विरोधक मागची गोष्ट उकरून काढत आहेत.ज्यांना काही काम नाही ते लोकं या गोष्टीवर बोलत आहेत,असा टोला पवार यांनी विरोधकांना लगावला.