मुंबई नगरी टीम
मुंबई । ऑस्ट्रेलियातील मेलबर्न युनिव्हर्सिटीत ‘मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल विथ बिझनेस’च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तुषार इंगळे या विद्यार्थ्याला प्रथम वर्षात आजारपणात एक पेपर न देऊ शकल्याने विद्यापीठातील प्रवेश धोक्यात आल्यानंतर सुद्धा सामाजिक न्याय विभागाने त्याच्या पाठीशी राहत त्याला संधी दिली आणि त्याने त्या संधीचं सोनं करून दाखवत संधी मिळवून देणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना योग्य सिद्ध केलं असल्याचं ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
राजर्षी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती चा लाभार्थी तुषार इंगळे, ऑस्ट्रेलिया, मेलबर्न येथील मेलबर्न युनिव्हर्सिसिटी येथे ‘मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल विथ बिझिनेस’ मध्ये शिक्षण घेत आहे. २०२० मध्ये त्याच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षेवेळी आजारी असल्याने एक पेपर तो देऊ शकला नव्हता, नियमानुसार प्रत्येक सेमिस्टर पास होणे आवश्यक असते अन्यथा विध्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबविण्यात येते, त्यामुळे तुषारची पुढील शिष्यवृत्ती थांबविण्यात आली होती.तो परिक्षेसमयी आजारी असल्याने एक पेपर देऊ शकला नाही तसेच त्याने पुरावा म्हणून युनिव्हर्सिटी कॅम्पस मधील डॉक्टरचे सर्टिफिकेट जोडून आयुक्तालयास मेल केला होता, शिवाय विद्यापीठाने त्याला दुसऱ्या वर्षात प्रवेश देखील दिला होता, परंतु नियमावली नुसार शिष्यवृत्ती देणे बंद केल्याने त्याचा प्रवेश तर धोक्यात आला होताच, पण निर्वाह भत्ता नसल्याने त्याचे जेवणाचे हाल सुरू झाले होते, या सर्वाचा परिणाम त्याची मानसिक स्थिती बिघडण्यात झाली होती.
अशावेळी तुषारने मंत्री धनंजय मुंडे यांना एक मेल करून ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली,मुंडे यांनी लगेच त्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडून मागवून घेतला, फक्त त्याची तब्बेत बरी नव्हती म्हणून तो एक पेपर देऊ शकला नव्हता परंतु तो हुशार होता, त्याला एक संधी देणे गरजेचे आहे, या विचाराने धनंजय मुंडे यांनी तुषारला शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता मंजूर करण्याचे निर्देश दिले.तुषारनेही या संधीचे सोने करत दुसऱ्या सत्रातील राहिलेला पेपर तर पास केलाच शिवाय दुसऱ्या वर्षातील सर्व सेमिस्टर पास होऊन आता तिसऱ्या वर्षात प्रवेश घेतला आहेत्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने तो सार्थ करून दाखवला. म्हणून त्याने मा मंत्रीमहोदयांचे आभार व्यक्त करणारे ट्विट केले आहे.’आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी मला आलेल्या अडचणीतून मुक्त करून व माझ्या गुणवत्तेचा विचार करून मला जीवनदान दिले होते. त्यांच्या विश्वासामुळेच मी परदेशात निश्चिंतपणे शिक्षण घेत आहे. मी मुंडे साहेबांचा आयुष्यभर ऋणी राहीन.’ अशा शब्दात तुषार ने धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.तर ‘आजाराशी लढत तू एक गुणवंत व अभ्यासू मुलगा आहेस हे तू सिद्ध केलंस; योग्य विद्यार्थ्यास संधी उपलब्ध करून देणे हे आमचं कामच आहे. त्या संधीचं तू सोनं केलंस आणि आम्हाला योग्य सिद्ध केलंस. तुझ्या उर्वरित अभ्यासक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!’ असे ट्विट करता खुद्द धनंजय मुंडे यांनी तुषारच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आहे.