राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध; भाजपच्या उमेदवाराची माघार

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे.भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.याची अधिकृत घोषणा बाकी आहे.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांनी तर भाजपकडून भाजपकडून संजय उपाध्याय यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल होते.भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात होती यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते.त्यानुसार आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाचा विचार करून भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला.त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अभिनंदन केले.

Previous articleराज्यातील खराब झालेल्या सर्व रस्त्यांची दुरूस्ती १५ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे निर्देश
Next articleमोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला : नाना पटोले