मुंबई दि.२९ मनसेचे मालाडचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले आहे. जैसी करनी, वैसी भरनी, असे म्हणत निरुपम यांनी मनसेला प्रत्युत्तर दिले आहे. कायदेशीर आणि काय बेकायदेशीर, काय आहे हे ठरवण्याचा मनसेला अधिकार नाही. फेरीवाल्यांना मारहाण झाली त्यावेळी पोलीस गप्प बसले होते. यापुढे फेरीवाले शांत न बसता प्रत्युत्तर देतील असा इशारा निरुपम यांनी दिला.
शिवसेनेचे महत्व कमी करण्यासाठी भाजप मनसेला लपून पाठिंबा देत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.माळवदे लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असेही निरुपम म्हणाले.यापुढे विनंती नव्हे तर युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल आणि संघर्ष व्हायलाच हवा. जशास तसे उत्तर देण्याचा अधिकार फेरावाल्यांनाही आहे., असेही निरूपम म्हणाले.