‘नवनीत’ नाम सुनके फ्लॉवर समझे क्या,फायर हूँ मैं !..खा.नवनीत राणांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेशी सातत्याने पंगा घेणा-या आणि समाज माध्यमात नेहमीच चर्चेत असणा-या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.सध्या देशात आणि विदेशात गाजत असलेल्या ‘पुष्पा द राईज’ या सिनेमातील संवाद म्हणत त्यांनी समाज माध्यमात एक व्हिडीओ शेअर केला आहे.’नवनीत’ नाम सुनके फ्लॉवर समझे क्या,फायर हूँ मैं.., असा डायलॉग म्हणत त्यांनी होळीच्या दुस-या दिवशी विरोधकांना इशारा दिल्याचीच चर्चा आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काल होळीच्या दिवशी मेळघाट मधिल आदिवासी बांघवा सोबत नृत्य करून होळीचा सण साजरा केला.त्यानंतर त्यांनी आज ‘पुष्पा स्टाईल’ व्हिडीओ आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे.सध्या या व्हिडीओची चर्चा समाज माध्यमात आहे.दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा द राईज’ या सिनेमातील संवाद सध्या चर्चेत आहे.साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलेला हा संवादही समाज माध्यमात चांगलाच गाजला होता.आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेअर केलेला व्हिडीओ समाज माध्यमात धुमाकूळ घालत आहे.हुबेहूब ‘पुष्पा’सारखा हनुवटीखालून हात फिरवत,’नवनीत” नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर हूँ मैं…’, असा संवाद म्हणत खा.नवनीत राणा यांनी व्हिडीओ शेअर केला.सातत्याने भाजपची बाजू घेऊन शिवसेनेशी पंगा घेणा-या खा.राणा यांनी ‘फायर हूँ मैं’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधकांना इशारा दिल्याची चर्चा आहे.

Previous articleराज्यसभेच्या ६ जागा रिक्त होणार; संजय राऊतांना चौथ्यांदा संधी मिळणार
Next article‘शिवसैनिक’ हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या ‘भंगारांना’ दाखवून द्या ! उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल