दिल्लीत मास्क सक्ती ! महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती होणार का..आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशातील काही राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र लिहून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना केल्या आहेत.त्यानुसार दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे.मात्र राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात असल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती ( mask compulsory in Maharashtra) होणार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना रूग्ण संख्या अटोक्यात आल्याने गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र गेल्या दोन दिवसात काही प्रमाणात रूग्ण संख्या वाढली (Coronavirus) असल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण आहे.त्यातच केंद्राने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र (Central Government letter to 5 states) लिहून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना केल्या आहेत.त्यानंतर दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती केली जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी आज महत्वाची माहिती देत सध्याच्या परिस्थितीत राज्यात पुन्हा मास्क सक्ती (wear a mask) करण्याची शक्यता फेटाळली.केंद्राच्या पत्रानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याचे टोपे यांनी यांनी सांगून राज्यात सध्या १३५ रूग्ण आढळल्याचे स्पष्ट केले.यापुर्वी राज्यात एकाच दिवसात ६० हजार रूग्ण आढळून यायचे त्यामुळे सध्याची रूग्ण संख्या पाहता घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याचे किंवा चिंता व्यक्त करण्याचे कारण नाही, गेल्या दोन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे टोपे म्हणाले.राज्यात पुन्हा मास्क सक्तीचा गरज नाही.मात्र,गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले.राज्यातील कोरोना परिस्थितीवर लक्ष असून, राज्यात लहान मुलांचे लसीकरण सुरू असून १२ ते १५ या वयोगटातील मुलांनादेखील लस दिली जात आहे.तसेच ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे.सध्या हे बुस्टर डोस खासगी रुग्णालयातून दिले जात असल्याचेही टोपे यांनी सांगून सध्याच्या परिस्थितीत राज्यात मास्क सक्तीचा गरज नसल्याचे सांगून राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

Previous articleघोटाळे बाहेर येत असल्यानेच विरोधकांचा पोलखोल रथावर भ्याड हल्ला
Next articleभोंग्याच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेणार ; मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित करणार