कर्जमाफीच्या कामाच्या ताणाने एका अधिका-याचा मृत्यु तर; एक अतिदक्षता विभागात
मुंबई दि.२ राज्य सरकारच्या छ.शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीच्या अमलबजावणी प्रक्रियांमुळे सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अती कामाच्या तणावामुळे गेल्या चार महिन्यापासून त्रस्त असून सिन्नरमध्ये रतीलाल अहिरे या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर; पुण्यामध्ये खंडागळे या अधिकाऱ्यावर दक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
राज्य सरकारने राज्यातील शेतक-यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने अनेक निकष ठरवित शेतक-यांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या तर गेल्या ४ महिन्यापासून कामासाठी वरिष्ठ स्तरावरून येणारा सततचा दबाव, सतत बदलणारी प्रक्रिया आणि वरिष्ठांचे आदेश यामुळे या प्रक्रित काम करणारे विशेषतः सहकार विभागातील अधिकारी कर्मचा-यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून, अनेक जण तणावा खाली असल्याचे समजते.
सिन्नरमध्ये रतीलाल अहिरे या अधिकाऱ्याचा तणावामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप केला आहे.तर
पुण्यामध्ये खंडागळे या अधिकाऱ्यावर दक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर सहकार विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेची तातडीची बैठक उद्या पुण्यात बोलवण्यात आली आहे. कर्जमाफीचे जाचक नियम तसेच धंदेवाईक तक्रारदारांना प्रशासनात प्रोत्साहान मिळत असल्याने तणाव वाढल्याची तक्रार अधिका-याकडून करण्यात येत आहे. या प्रमुख विषयावर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे.