मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई दि. २ काल दादर परिसरात फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात झालेल्या राड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

अनधिकृत फेरीवाल्यांबाबतच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी दादर परिसरात फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते. या राड्यानंतर आज राज ठाकरे फेरीवाला मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेवून याची माहिती देणार आहे. आज दुपारी १२ वाजता “वर्षा” निवासस्थानी राज ठाकरे भेट घेणार आहेत.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक होवून मुंबई आणि उपनगरातील अनधिकृत फेरीवाला हटाव ही मोहिम सुरू केली आहे.मनसेच्या या मोहिमेमुळे मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानका शेजारील आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले हटविले गेले आहेत.
काल दादर मध्ये काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकदा राडा झाला. फेरीवाला सन्मान मार्चसाठी दादरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी बटाटे फेकून मारत हा मोर्चा उधळून लावला.

Previous articleपरराज्यातील किटकनाशके आणि बीटी बियाणे विविध नावाने राज्यात विक्री करता येणार नाही
Next articleकर्जमाफीच्या कामाच्या ताणाने एका अधिका-याचा मृत्यु तर; एक अतिदक्षता विभागात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here