परराज्यातील किटकनाशके आणि बीटी बियाणे विविध नावाने राज्यात विक्री करता येणार नाही

परराज्यातील किटकनाशके आणि बीटी बियाणे विविध नावाने राज्यात विक्री करता येणार नाही

मुंबई, दि. १  किटकनाशके आणि बीटी बियाण्यांचे परराज्यात उत्पादन करून महाराष्ट्रात ते विविध कंपन्यांच्या नावाने विक्री करण्यासाठी परवाना न देण्याबाबतचा महत्वपूर्ण आज कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी घेतला. कुठली ही परिस्थितीत कीट चा प्रकोप आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या स्तरापर्यत जाणार नाही याची दक्षता क्षेत्रीयस्तरावर  घ्यावी. गुणवत्ता नियंत्रणासाठी विक्री परवाना देण्याचा अधिकार आता स्थानिक स्तरावरील यंत्रणा कडे न देता राज्यस्तरीय यंत्रणेला देऊन संनियंत्रण करण्याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

राज्यात किटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षातील किटकनाशकांचे नमुने तपासणी, अप्रमाणित नमुन्यांसंदर्भात करण्यात आलेली कारवाई याचा आढावा घेतला.जिल्हास्तरावर गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वंतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचे  निर्देश कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.अनेक कंपन्या परराज्यातून माल आणून स्वताच्या ब्रँण्डनेमने विकतात. यामुळे कारवाई करतांना संबंधित कंपनीवर कायदेशीर अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारचे को-मार्केटींग करण्याचा परवाना देण्यात येऊ नये,असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

 

Previous articleपद्मावती सिनेमावर बंदी घाला ! अन्यथा वर्षावर मोर्चा
Next articleमनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here