मुंबई नगरी टीम
मुंबई । कोळशाचा पुरवठा अपुरा होत असल्याने राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात होणा-या लोडशेडींगमुळे ग्रामिण भागातील जनतेला वीज संकटाचा सामना करावा लागत असतानाच आज राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच काही मिनिटांसाठी लाईट गायब झाल्याने वीज समस्येचा सामना करावा लागला.वीज गायब झाल्याने १० मिनिाटांसाठी मंत्रालयातील कामकाज ठप्प झाले होते.
ऐन उन्हाळ्यात अपु-या कोळशामुळे राज्यातील काही भागात लोडशेडींग करण्यात येत आहे.तीव्र उन्हाळ्यात वीज गायब झाल्याने राज्यातील ग्रामिण भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाच आज राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच वीज गायब झाल्याने सुमारे १० मिनिटांसाठी मंत्रालयातील कामकाज ठप्प झाले.मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच मंत्रालयातील वीज गायब झाल्याने मंत्रिमंडळाची बैठकही आटोपती घ्यावी लागली.आज मंत्रालयात ४ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते.मात्र मंत्रालयात न येता मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावरून या बैठकीला हजेरी लावली.मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच ५ वाजून ३० मिनिटांनी मंत्रालयातील बत्तीगुल झाली.मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच वीज गायब झाल्याने संबंधित अधिका-यांची चांगलीच धावपळ उडाली.मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाच्या प्रश्नावर अनौपचारीक चर्चा सुरू असतानाच वीज गेल्याने व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री यांनी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकले नाहीत.त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक आटोपती घ्यावी लागली.