माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा ! काय आहे कारण ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथील नवसंकल्प शिबिर घोषणापत्रातील एक व्यक्ती एक पद या घोषणेच्या अंमलबजावणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये सुरुवात झाली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी याची सुरुवात करत मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

नसीम खान यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष अशी दोन पदे होती. प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसच्या बैठकीत नसीम खान यांनी राजीनाम्याची घोषणा केली व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे. एक व्यक्ती एक पद असावे या निर्णयानंतर महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान हे पहिले पदाधिकारी ठरले आहेत. नसीम खान यांनी स्वत:हून त्यांच्याकडील दोन पैकी एका पदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Previous articleउद्धव ठाकरे,अजित पवार,नाना पटोले सांगा ! राज्यात पेट्रोल डिझेलची महागाई कोणामुळे आहे ?
Next articleएकदाची जातीनिहाय जनगणना करुनच टाका : शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका