मुंबई नगरी टीम
मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधिल वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला होता.शिंदे मंत्रिमंडळाच्या आजच्या विस्तारात त्यांना पुन्हा मंत्रीपदी संधी दिली गेल्याने भाजपच्या नेत्या आणि उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.मंत्री संजय राठोड यांचा एकेरी उल्लेख करीत,त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे.जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.मात्र आज झालेल्या विस्तारात शिंदे गटाकडून पुन्हा संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे.माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे.जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया वाघ यांनी दिली आहे.