मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून,सध्या राजकारणात ऐकमेकांचे कट्टर वैरी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.आज विधानभवनात प्रवेश करताना हे दोन्ही नेते विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ एकमेकांसमोर आले.दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत हसत-खेळत,गप्पा मारत विधानभवनात प्रवेश केला.हा दुर्मिळ क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी छायाचित्रकारांची झुंबड उडाली होती. उद्धव ठाकरे हे भाजपसोबत पुन्हा जाण्याची शक्यता नसली तरी या दोन नेत्यामधिलयांच्यातील हा सुसंवाद अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकेकाळचे जवळचे मित्र.मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोघांमधील दरी वाढली.गेल्या आठ महिन्यांपासून दोघांची भेटही झालेली नव्हती.मात्र आज विधानभवनात एक सुखद योगायोग घडला.हे दोघा नेत्यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केला.दोघांमध्ये काही पावले चालत असताना बोलणेही झाले.दोघेही हसत खेळत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकारांची एकच झुंबड उडाली.२०१९ च्या निवडणुकांनंतर उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दरी निर्माण झाली.एकनाथ शिंदे यांच्या आठ महिन्यांपुर्वीच्या बंडानंतर तर दोघेही एकमेकांविरोधात शड्डू ठोकूनच उभे ठाकले.गेल्या आठ महिन्यांत ते एकमेकांना भेटलेही नाहीत.मात्र आज विधानभवनात एक वेगळेच चित्र पहायला मिळाले.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी हे दोन्ही नेते विधानभवनात प्रवेश करताना एकत्र दिसून आले.हे दोन्ही नेते समोरासमोर येताच त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत एकमेकांशी गप्पा मारल्या. दोघांच्याही चेह-यावर स्मितहास्य होते. एकमेकांशी छान गप्पा मारत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सभागृहात निघुन गेले.दोनच दिवसांपुर्वी सभाग़हात एका लक्षवेधी सूचनेच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय आला होता.तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरकी घेत सरकार आदित्य यांच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे अशी मिश्किल टिप्पणी केली होती.तेव्हा एकच हास्यकल्लोळ उडाला होता.