मुंबई नगरी टीम
मुंबई । खारघर येथे झालेल्या कार्यक्रमात निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा सोहळा दुपारच्या सुमारास घेतल्याने उष्माघाताने १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला.या पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल करीत खारघर येथे झालेल्या कार्यक्रमात १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
खारघर येथे झालेल्या कार्यक्रमात निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा सोहळा दुपारच्या सुमारास घेतल्याने उष्माघाताने १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला.या पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती घटनेच्या तपासाअंती एका महिन्यात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.तर या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच या बळींना जबाबदार असून,सरकारच्या गर्दी जमवण्याच्या अट्टाहासामुळे हे बळी गेले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. या घटनेवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.खारघरच्या कार्यक्रमात १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला २० लाख लोक जमा झाले होते.उष्माघातामुळे आणि इतर गैरसोयींमुळे १०० लोकांचा बळी गेलेला असताना एक सदस्यीय समिती नेमली हे देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बोलत आहेत असा सवाल करून, महाराष्ट्राची जनता दुधखुळी आहे का ? की तुम्ही काहीही सांगाल आणि आम्ही विश्वास ठेवू असे म्हणत सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील जनतेला तुम्ही काय समजता असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
खारघर येथिल कार्यक्रमात निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यास २० लाख श्री सदस्यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताने १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले.या घटनेनंतर ढिसाळ नियोजनावरून विरोधकांनी सरकारवर हल्लोबोल करीत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.या पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती घटनेच्या तपासाअंती एका महिन्यात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.दरम्यान खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
या कार्यक्रमादरम्यान १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. सुरुवातीला उष्माघाताने १४ अनुयायांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यानंतर समाजमाध्यमातून वेगवेगळी माहिती उघडकीस येत आहे.या सोहळ्यात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. अनुयायी सात तास पाण्याशिवाय व खाण्याशिवाय उन्हात होते. गर्दीचे नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोचण्यास विलंब झाला. राज्यात उष्णतेची लाट असताना उघड्यावर उन्हात कार्यक्रम घेण्यात आला. असा भव्य कार्यक्रम करण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीला काम देण्यात आले. या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीपेक्षा जास्त मृत्यू झाला आहे. अशा अनेक बाबी टप्प्याटप्प्याने उघडकीस येत आहेत. या सर्व बाबींची शहानिशा करून सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे असेही अजित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
या कार्यक्रमाला तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उष्णतेची लाट लक्षात घेता सर्व शक्यतांची पडताळणी सरकारकडून होण्याची आवश्यकता होती.तथापि ती न झाल्याने १४ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना नैसर्गिक नसून शासननिर्मित आहे.सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.त्यामुळे या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्दैवी घटना याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. अनुयायांवर मोफत उपचार करून त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करावी.भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे मात्र एकाही मागणीबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही अशी नाराजीही अजित पवार यांनी पत्रात नमूद केली आहे.