तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील २० सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने आज राज्यातील २० वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,संजय जयस्वाल यांची नियुक्ती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे.तर गेल्याच महिन्यात पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करूनही पदभार न स्वीकारलेले तुकाराम मुंढे यांची नियुक्ती मंत्रालयात मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज तब्बल २० सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय जयस्वाल यांची नियुक्ती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.तर गेल्याच महिन्यात पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आलेले परंतु या विभागाचा कार्यभार न स्वीकारलेले तुकाराम मुंढे यांची नियुक्ती मंत्रालयात मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नियुक्ती गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे.एम.एम.आरडीचे मुख्य आयुक्त श्रीनिवासन यांची नियुक्ती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची नियुक्ती महावितरणचे महाव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागी महावितरणचे महाव्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राधिका रस्तोगी यांची नियुक्ती मंत्रालयात नियोजन विभागाच्या प्रधान सचिव तथा विकास आयुक्तपदी करण्यात आली आहे.महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांची नियुक्ती अल्पसंख्यांक विभागाच्या प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेते अतिरिक्त मुख्य आयुक्त असेश शर्मा यांची नियुक्ती मंत्रालयात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव ( २ ) म्हणून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य खादीग्राम उद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांची नियुक्ती मंत्रालयात ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिव म्हणून करण्यात आली आहे.अल्पसंख्यांक विभागाचे सचिव अनुप यादव यांची नेमणूक महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. अमित सैनी यांची नियुक्ती जय जीवन अभियानचे संचालक म्हणून करण्यात आली आहे.तर त्यांच्या जागी उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त माणिक गुरसाल यांची नेमणूक करण्यात आली आहे.नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती पुणे येथे साखर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती पुण्यात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे.स्वच्छ भारत अभियानचे ( ग्रामीण) आणि पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे विभागाचे सह सचिव तथा संचालक प्रदिप कुमार यांची नियुक्ती नागपूर येथे रेशीम विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे.नागपूरचे मनरेगाचे आयुक्त शंतनु गोयल यांची नियुक्ती नवी मुंबई येथे सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांची नेमणूक माहिती आणि तंत्रज्ञानचे संचालक म्हणून करण्यात आली आहे.राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान,मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वासेकर यांची नियुक्ती पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्तपदी करण्यात आली आहे.तर मुंबईचे अतिरिक्त आयुक्तपदी सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleधनंजय मुंडे लोकसभेची निवडणूक लढविणार की नाही ? मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
Next articleजागा वाटप महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरणार का ? अशोक चव्हाण यांनी स्पष्टच सांगितले