मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे वर्ग सकाळी ७ ऐवजी सकाळी ९ नंतर भरवावेत असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र खासगी शाळांनी यांची अंमलबजावणी न केल्यास संबंधित शाळांचे परवानाचे नुतनीकरण करण्यात येणार नसल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
विद्यार्थी रात्री उशीराने झोपून सकाळी लवकर उठत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरीक व मानसिक आरोग्यावर होत असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या,सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे सकाळच्या सत्रातील वर्ग सकाळी ९ नंतरच भरवले जावेत असे निर्देश राज्य शासनाने निर्देश दिले आहेत.त्यामुळे खासगी शाळांसह सर्व माध्यमांच्या शाळांमधिल पुर्व माध्यमिक ते इयत्ता ४ थीचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविण्यात येणार आहेत.राज्य शासनाचे काही आदेश राज्यातील खासगी शाळा मानत नसल्याने काल जारी केलेले आदेश खासगी शाळांचे व्यवस्थापन पाळतील का याबाबत शंका आहे. मात्र अशा खासगी शाळांना दर तीन वर्षांनी शाळांचे परवाने नुतनीकरण करून घ्यावे लागते. त्यामुळे काल जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्यास अशा शाळांच्या परवानाचे नुतनीकरण केले जाणार नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.