विस्तार केवळ राणेंसाठी नाही; शिवसेनेच्या मंत्र्यामध्येही फेरबदल होणार

विस्तार केवळ राणेंसाठी नाही; शिवसेनेच्या मंत्र्यामध्येही फेरबदल होणार !

मुंबई दि. २२ नागपूर हिवाळी अधिवेशापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अहमदाबाद मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराला शहा यांनी हिरवा कंदिल दाखवला होता.

हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे या महिन्याअखेर विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारामध्ये केवळ भाजपाच्याच नव्हे तर शिवसेनेच्याही मंत्र्यांमध्ये फेरबदल केले जाणार आहेत. याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी दुरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा केवळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सामावून घेण्यासाठी असेल तर; भाजप मधिल दोन कॅबिनेट मंत्र्यांना वगळण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.

Previous articleमुख्यमंत्री आणि ठाकरे एकाच दिवशी कोल्हापूरात! मात्र  टीकेचे प्रहार होणार ?
Next articleराम शिंदेंचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता