राम शिंदेंचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता

जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा शौचालये बांधली असती तर; राम शिंदेंचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता

सामनातून सरकारला टोला

मुंबई दि.२२ जागतिक शौचालय दिना दिवशीच उघड्यावर लघुशंका करणारे राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आज  शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘सामनाच्या’ संपादकीयमधून राम शिंदे यांचा आणि सरकारचा समाचार घेतला आहे.

बार्शी तालुक्याच्या दौ-यावर असताना,
राज्याचे जलसंधारण राम शिंदे उघड्यावर लघुशंका करत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर आणि प्रसार माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडीओवरून राम शिंदेंना टीकेला सामोरे जावे लागत आहे. ”स्वच्छ भारत अभियानच्या प्रसिद्धीवर शेकडो कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले पण ते वायाच गेले. त्या पैशांत महाराष्ट्रात किमान दोन हजार शौचालये राष्ट्रीय महामार्ग व इतरत्र बांधता आली असती तर राम शिंदे यांचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता असता अशा शब्दात सामनातून सरकारचा समाचार घेण्यात आला आहे. राम शिंदे यांना का दोष द्यायचा? हे कुणाच्याही बाबतीत घडू शकते.”, असेही उध्दव ठाकरे यांनी संपादकीयमध्ये म्हटले आहे.

Previous articleविस्तार केवळ राणेंसाठी नाही; शिवसेनेच्या मंत्र्यामध्येही फेरबदल होणार
Next articleसांप्रदायिकतेविरुद्ध संघटनाची गरज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here