चंद्रकांत पाटील विनोद तावडे उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी “मातोश्रीवर”

चंद्रकांत पाटील विनोद तावडे
उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी “मातोश्रीवर”

पोटनिवडणूकीवर चर्चा

मुंबई दि. २३ येत्या ७ डिसेंबरला होणारी विधानपरिषदेची निवडणूक आणि संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटसाठी मातोश्रीवर पोहचले असून या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा सुरू आहे.

येत्या ७ डिसेंबर रोजी  विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी निवडणूक होत आहे. भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी महसूलमंत्री पाटील आणि शिक्षममंत्री तावडे यांनी ‘मातोश्री’वर जावून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना साकडं घातले आहे .माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपने अन्य उमेदवार दिल्यास शिवसेना या उमेदवाराला पाठिंबा देवून शकते त्यामुळे अन्य पक्षाची मदत न घेता भाजपचा उमेदवार विजयी होवू शकतो. म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत. या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा सुरू असल्याचे समजते.

शिवसेनेचा राणेंच्या उमेदवारीला प्रचंड विरोध आहे, त्यामुळे भाजपने उमेदवार दिल्यास शिवसेनेच्या पाठिंब्याने सहज विजय मिळू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुरध्वनीवरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर आज चंद्रकांत पाटील आणि तावडे यांनी मातोश्रीवर जावून चर्चा केली. राणे यांच्या नावाची चर्चा मावळल्याने भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, शायना एनसी आणि राष्ट्रवादीतून भाजपात आलेले प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा असली तरी दुस-या पक्षातून आयात केलेल्यांना भाजपात मानाचे पान मिळते असे अधोरेखित होईल आणि नाहक कार्यकर्त्यांची नाराजी ओढवली जावू शकते त्यामुळे माधव भंडारी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Previous articleसंघात गाढव आले तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो
Next articleशरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here