११ हजार नाभिक समाजाचे कार्यकर्ते मुंडन करून मुख्यमंत्र्यांना केस भेट देणार

११ हजार नाभिक समाजाचे कार्यकर्ते मुंडन करून मुख्यमंत्र्यांना केस भेट देणार

२ डिसेंबरला राज्यभर रास्ता रोको

मुंबई दि.२३ मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात राज्यातील नाभिक समाज आक्रमक झाला असून, येत्या २ डिसेंबर रोजी राज्यभर रास्ता रोको करण्यात येवून १३ डिसेंबरला नागपुरमध्ये हिवाळी अविवेशनावर मोर्चा काढून ११ हजार कार्यकर्ते सामुहिक मुंडन करून मुख्यमंत्र्यांना केस भेट देणार असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिली आहे.

पाटस येथिल कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचे सांगत, राज्यातील नाभिक समाजाने गेल्या शनिवारी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला होता. यावेळी जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन देवून मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष दळे यांनी दिला होता.

आज महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिका-यांची बैठक देऊळगाव येथे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानुसार मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी दौरे करतील तेथे कार्यकर्त्यांच्यावतीने काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. तसेच येत्या २ डिसेंबरला राज्यभर रास्ता रोको करण्यात येवून, १३ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर समाजाचा विराट मोर्चा काढून ११ हजार कार्यकर्ते सामुहिक मुंडन करून मुख्यमंत्र्यांना केस भेट देणार असल्याचे दळे यांनी सांगितले.

Previous articleशरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
Next article३ ते ५ हजार भरून शेतक-यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची सवलत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here