मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरूवात

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

मुंबई दि. २३ काही वेळापूर्वी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक सुरू आहे.या बैठकीत विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील.

काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे.या बैठकीत विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी मंत्री एकनाथ खडसे,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे हे या बैठकीला उपस्थित आहेत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तब्बेत ठिक नसल्याने ते आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सहभागी झाले नाहीत.पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून कोअर कमिटी मध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना स्थान देण्यात आले आहे. बैठकीपूर्वी देवगिरी बंगल्यावर जावून मुख्यमंत्री फडणवीस यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या तब्बेतीची चौकशी केली.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरूवात
Next articleपोटनिवडणूकीसाठी माधव भंडारींच्या नावावर शिक्कामोर्तब ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here