पोटनिवडणूकीसाठी माधव भंडारींच्या नावावर शिक्कामोर्तब ?

पोटनिवडणूकीसाठी माधव भंडारींच्या नावावर शिक्कामोर्तब ?

मुंबई दि.२४    येत्या ७ डिसेंबर रोजी होणा-या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपने पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. काल रात्री उशिरा झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. भंडारी यांच्या नावावर संमती होवून शिवसेनेचा पाठिंबा मिळू शकतो.त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय सोपा झाला आहे.

काल रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी मंत्री एकनाथ खडसे,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.नारायण राणेच्या शिवाय इतर उमेदवाराच्या नावाला शिवसेनेकडून पाठिंबा मिळू शकतो.त्यामुळे शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याकरता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. राणे हे आमचे उमेदवार नसतील, असेही स्पष्ट केले. त्यानंतरच शिवसेनेने भाजपाला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपाचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ असे मिळून १८५ सदस्य होतात. त्यामुळे भाजपचा उमेदवार सहज विजयी होईल.
येत्या दोन दिवसांत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मुख्यमंत्री स्वतः याबाबत चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतील, असे म्हटले जाते.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरूवात
Next articleहिंदूंना दिलेल्या या ‘तिहेरी वचनां’चे काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here