मुख्यमंत्र्यांच्या माफीमुळे नाभिक समाजाचे आंदोलन स्थगित

मुख्यमंत्र्यांच्या माफीमुळे नाभिक समाजाचे आंदोलन स्थगित

पुणे दि.२५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वारणानगर येथिल एका कार्यक्रमात नाभिक समाजाची माफी मागितल्याने या समाजाच्यावतीने करण्यात येणारी सर्व आंदोलने स्थगित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी आज दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी मागितली आहे. काल कोल्हापूरमधील वारणा येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ‘कोणलाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
‘माझ्या विधानावरुन वाद सुरु झाल्याचे लक्षात येताच मी त्याबद्दल एक पत्रक काढून तात्काळ माफी मागितली होती. मी समाजापेक्षा मोठा नाही. मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्यास मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,’ असे त्यांनी म्हटले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पदाधिका-यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागितल्यामुळे येत्या २ डिसेंबरला करण्यात येणारा राज्यव्यापी रास्ता रोको आणि १३ डिसेंबरला नागपूरमध्ये करण्यात येणारे सामुहिक मुंडन आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा दळे यांनी केली. प्रतापगडाच्या पायथ्याला जीवाजी महाले व राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे स्मारक उभारावे, बलुतेदारांचे स्वतंत्र आर्थिक महामंडळ निर्माण करावे, क्रिमीलीअरची अट रद्द करावी अशी मागणीही दळे यांनी यावेळी केली.

Previous articleशिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकलेत
Next articleपोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेसच्या बैठकीला सुरूवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here