भाजप उमेदवाराच्या नावावर आजच्या बैठकीत अंतिम फैसला

भाजप उमेदवाराच्या नावावर आजच्या बैठकीत अंतिम फैसला

मुंबई दि.२६ विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या सोमवारी २७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात आज रात्री बैठक होणार आहे.

येत्या ७ डिसेंबरला होणा-या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या सोमवारी २७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने भाजप आपल्या उमेदवाराचे नाव उद्या सकाळी जाहिर करणार आहे. भाजपच्या उमेदवाराच्या नावाचा फैसला आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्यात होणा-या महत्वपूर्ण बैठकीत केला जाणार आहे. आज रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे.भाजप प्रवक्ते माधव भंडारी , शायना एन.सी यांची नावे आघाडीवर आहेत.

Previous articleपोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेसच्या बैठकीला सुरूवात
Next articleमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटीलच खरे लाभार्थी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here