वन कायद्याचा भंग केल्याने गिरिश महाजनांवर गुन्हा दाखल करा

वन कायद्याचा भंग केल्याने गिरिश महाजनांवर गुन्हा दाखल करा

नवाब मलिक यांची मागणी

मुंबई दि.२८   राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी वन कायद्याचा भंग केल्याने, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन धावले होते. त्यामुळे त्यांनी वन कायद्याचा भंग केल्याने, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांनी केली.बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ही जबाबदारी वन विभागाची असताना महाजन यांनी सुरक्षेची तजवीज नसताना नसती उठाठेव का केली असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.

Previous articleभाजपवालेच नोटाबंदीचे खरे लाभार्थी !
Next articleआजपर्यंत एक चिमणीसुद्धा मारली नाही