जलदगती न्यायालयाला वेळेची मर्यादा हवी

जलदगती न्यायालयाला वेळेची मर्यादा हवी

मराठा मोर्चाची मागणी

मुंबई दि. २९    कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशी सुनावण्यात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पीडीत भगीनीला श्रद्धांजली वाहण्यात आली. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात आला होता. अशा घटनेत खटला चालवताना जलदगती न्यायालयाला वेळेची मर्यादा हवी अशी मागणी मराठा मोर्चाचे कार्यकर्त विरेंद्र पवार यांनी केली.

आज न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत मराठा मोर्चाच्यावतीने करण्यात येवून ,अशा गुन्ह्यांमध्ये खटला चालवण्यासाठी जलदगती न्यायालयाला वेळेची मर्यादा हवी तसेच सर्व गुन्ह्यांमध्ये अशी शिक्षा ठोठावण्यात येवून शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी अशी मागणीही करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चा महामुंबई तर्फे आज अमर जवान ज्योती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर कोपर्डीच्या पीडीत भगीनीला श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोपर्डीच्या अत्याचारी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या प्रक्रियेतील तपास यंत्रणा, पोलिस खाते, साक्षीदार, सरकारी वकील उज्वल निकम व न्यायालयाचे आभार मराठा मोर्चाच्यावतीने मानण्यात आले. या राज्यात कोणत्याही जातीधर्माच्या महिला-मुलीवर अत्याचार होऊ नयेत हीच आमची भावना आहे. या फाशीच्या शिक्षेतुन समाजात योग्य तो संदेश गेलेला आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Previous articleमहिलांचा सन्मान राखण्यासाठी कोपर्डीचा निकाल महत्त्वपूर्ण
Next articleकोपर्डी  निकालामुळे समाजामधील अपप्रवृत्तीना नक्कीच आळा बसेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here