कोपर्डीचा निकाल महिलांना बळ देणारा

कोपर्डीचा निकाल महिलांना बळ देणारा

पंकजा मुंडे

परळी दि. २९ कोपर्डी घटनेचा न्यायालयाने दिलेला निकाल राज्यातील तमाम महिलांना बळ देणारा आहे, तथापि अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी शासन व प्रशासन कठोर पावले उचलेल अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, हा निकाल समाधानकारक असून महिलांना निश्चितच बळ देणारा आहे. ज्या महिलांवर अत्याचार होतो, त्यांच्या पाठिशी न्याय व्यवस्था व शासन उभा असल्यास नक्की शिक्षा होते, हे यावरून दिसून आले आहे. कोपर्डी सारखा प्रकार भविष्यात होऊ नये, तसेच आमच्या कोणत्याही बहिणीवर अशी वेळ येऊ नये, हिच इच्छा ! परंतु जर अशी एखाद्यावर वेळ आली तर शासन व प्रशासन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील. अशा घटनांमधील आरोपींना तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous articleकोपर्डी  निकालामुळे समाजामधील अपप्रवृत्तीना नक्कीच आळा बसेल
Next articleमंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल, खांदेपालट ! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here