गांधींच्या मार्गाचा अवलंब करणा-या काँग्रेसने हिंसा करणे कितपत योग्य ?

गांधींच्या मार्गाचा अवलंब करणा-या काँग्रेसने हिंसा करणे कितपत योग्य ?

आ. नितेश राणे यांचा घरचा आहेर

मुंबई : मनसेच्या सैनिकांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मनसे आणि काॅग्रेस मध्ये संघर्ष निर्माण आहे. आज घडलेल्या प्रकारावरून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप ,प्रत्यारोप करीत असतानाच काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मनसेची बाजू घेत काॅग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मुंबई काॅग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आ. नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे काँग्रेसने घेतलेल्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘मनसेने नक्कीच चुकीचे केलेले आहे. पण महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब करणा-या काँग्रेसने याला उत्तर देताना हिंसा करणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करत, मनसेविरोधात निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगड्या दाखवणे कितपत योग्य आहे ? हा महिलांचा अपमान नाही का , नैतिकता आणि विचारप्रणाली ? असे आ. नितेश राणेंनी ट्विट केले आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे काही दिसत नाही
Next articleवाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला !